HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

ती भेट अखेर राहूनच गेली! विक्रम गोखलेंना पंकजा मुंडेंनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

मुंबई :- मराठी, हिंदी चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभियनाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (शनिवार, 26 नोव्हेंबर) निधन झालं. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहेच परंतु, राजकीय क्षेत्रात देखील त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. अशातच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी देखील विक्रम गोखलेंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. माझा आणि त्यांचा फोनवर नेहमीच संवाद व्हायचा पण आमची भेट अखेर राहूनच गेली अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, “ज्येष्ठ अभिनेते, एक हरहुन्नरी असा कलाकार आज आपल्यात राहिला नाही, मी सन्माननीय विक्रम गोखले यांना मनापासून श्रध्दांजली, आदरांजली वाहते. अनेक वेळा त्यांचा मला फोन यायचा आणि फोनवर ते भरपूर गप्पा मारायचे. माझे ट्विट बघायचे, माझे स्टेटमेंट बघायचे, माझ्या भाषणांवर प्रतिक्रिया द्यायचे आणि बऱ्याच वेळा म्हणायचे, तुझा धाडसीपणा मला खूप आवडतो. इतकं भरभरून कौतुक एवढं मोठं यश मिळवलेल्या व्यक्तीकडून ऐकून मला खूप आनंद होत असे”, अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली आहे.

“पण ते राहूनच गेलं…”

विक्रम गोखले यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला एकदा ते असंच म्हणाले की, विक्रम काकांना एकदा काॅफी प्यायला बोलवा, भरभरून गप्पा मारू, पण ते राहूनच गेलं… त्यांच्या त्या बोलण्याची आठवण सदैव होत राहील. कठीण काळात एवढया मोठया व्यक्तीने दोन शब्दांचा दिलेला आधार सदैव माझ्या आठवणीत राहील. विक्रम गोखले हे एक असे अभिनेते आहेत, ज्यांना सिनेसृष्टी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी प्रत्येक रोल ला एक डिग्निटी, उंची प्रदान करून दिली, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व राहील, असंही मुंडे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणण्यात आलं, यामध्ये बदलीच्या कायद्याचा भंग झाला- चंद्रकांत पाटील

swarit

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

News Desk

ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील! – देवेंद्र फडणवीस

Aprna