HW News Marathi
राजकारण

“…इतके दुटप्पी माणसाने वागू नये”, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | “राज ठाकरेंनी इतके दुटप्पी माणसाने वागू नये”, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहे. अजित पवार आज (2 डिसेंबर) बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी गुरुवारी (1 डिसेंबर) कोकण दौरादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेतून “राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचे राजकारण होते आहे, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, “शरद पवारसाहेबांना महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. 55 वर्षापासून पवारसाहेब राजकारण करत आहेत. पवारासाहेबांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यांसमोर ठेवला. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांनासोबत घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक राज ठाकरेंनी केलेले आरोप हे हास्यास्पद बाब असून यात नखभरही तथ्य नाही. राज ठाकरेंनी केलेल आरोप हे बिनबुडाचे असून राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही. हेच राजा ठाकरे जेव्हा शरद पवारांची मुलाखत घेत होते. तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते. इतके दुटप्पीही माणसाने वागू नये.”

राज ठाकरे नेमके काय म्हणाले

कोकण दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषदे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले, “शरद पवार नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांची नावे घेतात. परंतु, शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. तर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवारांनी केले. तर 1999 राज्यात राष्ट्रवादी काँग्रसेची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही

News Desk

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरलावून सेनेला घरचा आहेर

News Desk

शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाही | दानवे

News Desk