HW News Marathi
महाराष्ट्र

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस! संजय राऊत म्हणाले…..

मुंबई। महाविकास आघाडी सरकारवर ईडीचं सावट आहे राज्यासकरकर कडून वेळोवेळी सांगितलं जातंय. यातच आता राज्यचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी कडून नोटीस आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या रोकठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करत अनिल परब यांच्या नोटीस बदल माहिती दिली आहे. ते म्हणाले, “शाब्बास!

जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.

chronology कृपया समज लिजीये.

कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.

अटकेचा विडिओ व्हायरल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

News Desk

ओबीसी आरक्षणाप्रश्नी भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी! – नाना पटोले

Aprna