HW News Marathi
Covid-19

केरळात कोरोना रुग्णांमध्ये वाढ!

नवी दिल्ली। कोरोना विषाणू संपूर्ण देशात पसरून आता दीड वर्ष उलटून गेला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असतानाच, केरळमध्ये कोरोनाचा वेग सतत वाढत आहे. गेल्या 5 दिवसातच राज्यात सुमारे 1.50 लाख नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. केरळ व्यतिरिक्त महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही कोरोनाची प्रकरणे अधिक येत आहेत. केरळ जिथे शून्य रुग्णसंख्या होती तिथे आता सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

दिवसाची आकडेवारी

देशात गेल्या 24 तासात 45,083 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 35,840 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण 460 जणांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 59 हजार 906 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. राज्यात आज 126 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू संख्या

केरळमध्ये, कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या सतत 30 हजारांपेक्षा जास्त आहे. याच्या एक दिवस आधी देशातील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या 46 हजार 783 होती. केरळमध्ये मात्र, राज्यातील चाचणी सकारात्मकता दर (TPR) शुक्रवारी 19.22% च्या तुलनेत 18.67% वर आला. शनिवारी देशात व्हायरसमुळे 444 मृत्यू झाले. यामध्ये केरळमध्ये 153, महाराष्ट्रात 126, ओडिशामध्ये 68, तामिळनाडूमध्ये 21 आणि आंध्र प्रदेशमध्ये 19 मृत्यू झाले आहेत.

केरळमध्ये नाईट कर्फ्यू

केरळमध्ये सोमवारपासून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला जाईल. रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू केले जाईल. देशातील कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी (3.7 लाख) प्रकरणांपैकी 55% एकटे केरळचे आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. केरळमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आणि ओनमनंतर संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या दरम्यान, केरळमध्ये 1 लाख 49 हजार 814 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! – राजेश टोपे

Aprna

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk

लॉकडाऊनची भीती अजूनही टळली नाही – मुख्यमंत्री

News Desk