HW News Marathi
महाराष्ट्र

शौमिका महाडिकांची गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर!

कोल्हापूर। सैनिक टाकळी येथील बल्क मिल्क कुलर बंद का होत आहे. यातील दुधाची प्रत कमी लागते. मग युनिट चालक प्रत वाढवून देत नाही. हे बघण्याचे काम युनिट चालक की संस्थेचे, मग ही तक्रार संस्थेची कशी असू शकते, तुमचे दौरे कसले, सुफरवाझर तपासणीसाठी जातात का? कँनवर कोड दिसत नाही, मग हे सगळं बघण्याचे काम कुणाचे असे सर्व मुद्दे उपस्थित करून गोकुळाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी उदगाव सेंटर मधील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

नेमकं काय घडलं?

कोल्हापूरच्या उदगाव चिलिंग सेंटरमधील कामाचा शौमिका महाडिक यांनी आढावा घेतला. गोकुळमधील विरोधी महाडिक गटाच्या आक्रमक संचालिका अशी शौमिका महाडिक यांची ओळख आहे. सरप्राईज व्हिजिटच्या वेळी कामांमधील त्रुटींवरून शौमिकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. शौमिका महाडिक यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

शौमिका महाडिक आहेत तरी कोण?

शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा.

मे महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी झाल्या. महिला प्रवर्गात शौमिका अमल महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस होती. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी बाजी मारली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार, हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास परवानगी !

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या घरी बाप्‍पाचे आगमन

Aprna

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा, बारामतीत अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

News Desk