HW News Marathi
क्राइम

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे यांच्यासह तीन जणांना जामीन मंजूर

मुंबई | राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करणाऱ्या समता सैनिक दलाचे कार्यकर्ता मनोज गरबडे यांच्यासह तीन जणांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंडवडमध्ये शाईफेकची घटना घडली होती. या शाईफेक प्रकरणी तीन जणावर पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचे 307 कलम लावण्यात आले होते.

शाईफेक प्रकरणातील मनोज गरबडे हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता असून त्यांच्यासोबत विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना ही पोलिलसांनी अटक केले होते. या तिघांना आज न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. “कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली”, असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी 9 डिसेंबर रोजी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमात केले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी “आंबेडकर-फुले यांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झालेला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी काय हरकत नाही”,  असेही म्हणाले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “भीक मागून शाळा उभी केली. भीक म्हणजे काय आज आपण जे गणपती, नवरात्रीला, आंबेडकर जयंतीला शिवाजी महाराजांच्या जयंतीला जे जाऊन फिरतो. असे म्हणतो ना जयंती साजरी करायची आहे,” असे हात जोडून सांगितले. ऐ आमची जयंती साजरी करांची पैसे त्या. मी माझ्या खात्यावर जो गंमच्छा होता. तो काढून अॅक्शन घेऊन दाखविले. आणि त्यांनी भीक मागितली की, माझ्या शाळेला पैसे द्या, हातवारे करून त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, या भीक शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी काही छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे. माझ्या रक्ता रक्तामध्ये आंबेडकर-फुले हे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झालेला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी काय हरकत नाही.”

संबंधित बातम्या

शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ती’ सर्व शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची भाजप पदाधिकाऱ्याची कबुली

News Desk

मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

News Desk

राज ठाकरे यांचे ‘या’ प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

Aprna