HW News Marathi
राजकारण

“आंबेडकर-फुलेंनी शाळा सुरु करताना लोकांकडे भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | “कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली”, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील हे आजपासून दोन दिवसाच्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. चंद्रकांत पाटील हे आज (9 डिसेंबर) सकाळी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शाळांच्या अनुदानासंदर्भात वादग्रस्त विधान केले. चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधांनी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो. तर पैशाला अडचण येणार नाही. इमारतीचे जे पूर्णकरण आहे. ते ताबडतोप ते जिल्हा नियोजन निधीमधून देत आहेत. माझे म्हणणे आहे की, त्या व्यतिरिक्त खरे तर आज दिवसभरात मी ठिकठिकाणी विषय मांडणार आहे. सरकारवर अवलंबून का राहत आहात. या देशामध्ये शाळा कोणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय पैसे त्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणार होते. आता 10, 10 कोटी रुपये देणारे लोक आहेत. आता अशा सगळ्यानी ज्याला आपण सीएसआर म्हणतो.”

आपण वर्गणी गोळा करून मंदिरे उभे करतो ना मग…

“कंपनीच्या नफ्यातून 5 टक्के नाही, सॉरी 2 टक्के. 5 कोटीच्या वरटा टनवॉर असलेल्याचा 2 टक्के, नफ्याचा त्यांना सामाजिक कामावर त्यांना खर्च करणे हा कायदा झालेला आहे. त्यांना प्रश्न पडतो की याचे काय करायचे. अशा सगळ्यांकडे सुद्धा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागू. परंतु, आपल्याला सीएसआर सुद्धा ही मिळवू शकतो. खूप लोकांकडे मागू शकतो. हे पुण्याचे काम आहे. हे वाढले पाहिजे, हे रुजले पाहिजे. त्यासाठी आपण पैसे मागू, मंदिरे आपण उभी करतो. ती काय सरकारी पैशांनी उभी करत असतो का?, गावामध्ये आपण वर्गणी गोळा करतो. त्यातून मंदिर उभे करतो” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

 

Related posts

आम्ही भाजपच्या नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार, जानकरांची भूमिका

News Desk

राहुल गांधींचा अर्ज दाखल, वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

News Desk

गिरीश महाजन यांनी घेतली डॉ. तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट

News Desk