HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

मुंबई। महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील, अशी ठाम भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी (१४ डिसेंबर) येथे मांडली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर (Maharashtra-Karnataka border dispute) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना त्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश अमित शाह यांनी दिले.

केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, सीमाभागातील मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील. महाराष्ट्र शासन येथील जनतेसोबत खंबीरपणे उभे आहे. सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. जोपर्यंत यावर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करून या भागात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. बुधवारी बैठक सकारात्मक वातावरणात पार पडल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राकडून कायदा सुव्यवस्था राखली जात आहे : उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याकडून सीमावाद प्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काही ठराविक संघटना मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. अशा संघटनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका केंद्र शासनाने मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राकडून आतापर्यंत कोणत्याही कायद्याचा भंग झालेला नाही. सीमाभागातील लोकांविरोधात खटले दाखल केले जातात. कधी मराठी शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कधी मराठी भाषेचा विषय येतो. अशा विविध प्रश्नांवर मंत्र्यांची समिती अभ्यास करून मार्ग काढणार असल्याची माहिती, फडणवीस यांनी यावेळी दिली.

Related posts

“पूरग्रस्त भागातील दौरे टाळा”, शरद पवारांचं नेत्यांना आवाहन

News Desk

राज ठाकरेंचा मोर्चा आता वळणार मराठवाड्याकडे!

News Desk

“वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाईंना फोन करतो”, नितेश राणेंचा गंभीर आरोप

News Desk