HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा मोर्चा आता वळणार मराठवाड्याकडे!

पुणे। नाशिक आणि पुण्यातील मोर्चेबांधणीनंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवणार आहेत. त्यादृष्टीने मनसेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे लवकरच मराठवाड्यात सभा घेणार आहेत. या सभेसाठी तयारील लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

कार्यकर्त्यांना आदेश

मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते.

राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार

ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर गेले आहेत.

राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात

नाशिकनंतर पुण्याच्या मैदानात

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा केला होता.

ऑफरची जोरदार चर्चा

मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकासोबत अनेक अदृष्य हात

News Desk

ED चं समन्स आणि खडसेंची तब्येत खालावली, आजची पत्रकार परिषदही रद्द

News Desk

डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस

News Desk