HW News Marathi
महाराष्ट्र

आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही! – संजय राऊत

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला वादग्रस्त व्यक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत सडकून टीका केली आहे. “आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय मिळवितो”, असे म्हणत राऊतांनी पाटलांना टोला लगावला. पाटलांनी काल (१४ डिसेंबर) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतून बोलत होते. पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चर्चेला उधाण आले आहे.

राऊत म्हणाले, “अयोध्येत बाबरीचे पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होट बँकवाले पळून गेले. तेव्हा आमचे शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय मिळवितो. आमचं हिंदुत्त्व लोकांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासाठी आहे. बाळासाहेबांचं स्थान जनतेच्या मनात अढळ आहे.”

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली की, नाही, ते मला माहीत नाही. पण, त्यांनी या देशात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यापूर्वी वीर सावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार महाराष्ट्रात पेरला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूह्रदयसम्राट अशी उपाधी देशातील जनतेने दिली. आमचे हिंदुत्व हे केवळ मंदिरापुरते मर्यादिते आणि राजकारणापुरते मर्यादित नाही, तर आम्ही त्यापलीकडे आहोत.”

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले

“उमेदवार निवडणूक तिकिटासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “तिकीट पक्षाचे असेत, यामुळे माझे तिकीट कापले असे म्हणून चुकीचे असते. आणि तुमचे कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देतो. व्होट बँक पक्षाची असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. अलिकडच्या काळात ही व्होट बँक अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSCच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र द्या अन्यथा…पडळकरांचा सरकारला इशारा

News Desk

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार, बाळासाहेब थोरात

News Desk

मोदींनी आंदोलनजीवी म्हटल्यानंतर नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

News Desk