नागपूर | मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत दिला. हिवाळी अधवेशनात राज्य सरकारने मंगळवारी (27 डिसेंबर) कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव, महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केला होता. यानंतर कर्नाटक सरकारचे कायदा मंत्री माधू स्वामी यांनी मुंबई केंद्र शासित करावी, अशी मागणी कर्नाटकच्या विधानपरिषदेमध्ये केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत. सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे. त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवार नेमके काय म्हणाले
यासंदर्भात अजित पवार यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इंफॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित करत अजित पवार म्हणाले, “विविध प्रांतातील लोक आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील गुण्यागोविंदाने राहतात. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आपण सगळ्यांना एकोप्याने घेतो. सीमाप्रश्नाला अशा प्रकरे चुकीचे वळ देण्याचा आणि सीमावासियांच्या प्रश्नाला ठेस पोहोचविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून वारंवार होत आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मंत्र्यांच्या दोन्ही शब्दांचा निषेध करावा. कर्नाटक सरकार वारंवार करत असल्याची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी. कारण, स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री-मंत्री अशी बैठक घेतलेली होती. आणि तेव्हा काही गोष्टी ठरलेल्या होत्या. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून नाराजी व्यक्त करावी. आणि असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाही. याबाबत त्यांनी ताकीत द्यावी. मी सुद्धा कर्नाटकच्या कायद्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदारांचा तीव्र शब्दात निषेध करतो. बेळगावच्या पेपरमध्ये बातमी देखील आली आहे.”
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला निषेध नोंदवावा! – अजित पवार
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.