HW News Marathi
मुंबई

ठाकरे गटाच्या BMC कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; दोन्ही गटाचे नेते आमने-सामने

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (Brihanmumbai Municipal Corporation) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यलयावर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाने दावा केला आहे. शिंदे गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज (28 डिसेंबर) मुंबई पालिका कार्यालयात दाखल झाले. यापूर्वी विधानसभेमधील कार्यालयासंदर्भात देखील असाच राडा झाला होता. आणि आता शिंदे गटाने ठाकरे गटाच्या मुंबई पालिका कार्यालयात दावा केला आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकांची पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते आमने-सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक शीतल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि पदाधिकारी ठाकरे गटाच्या कार्यालायतील कॉन्फरस हॉलमध्ये बसून ठाकरे ठाकरेशी चर्चा केली. परंतु, ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आक्षेप नोंदविला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते आमने-सामने आल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप सर्वांच  बाहेर काढले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्यापालिका कार्यालयावर शिंदे गट ताबा घेण्याची भीती वाटत होती. यामुळे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दररोज पक्ष कार्यालयात येऊन बसण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर दररोज नगरसेवक आणि पदाधिकारी येऊन बसत होते.

Related posts

जयकुमार रावल यांना न्यायालयात उत्तर देऊ | नवाब मलिक

swarit

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन

News Desk

आयएएस अधिकारी प्रवीण दराडेंमुळेच बाळासाहेब ठाकरे स्मारक’ रखडले

News Desk