HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात 2000 जणांनी एकत्र येत कोरोना नियमांची केली  पायमल्ली!

पुणे। गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप काही शहरात कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणात नाहीये. पुण्यातही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात जमावबंदीचा निर्णय लागू केला आहे. असं असतानाही शिवसेनेच्या एका नेत्यानं आपल्या मुलाच्या लग्नात जवळपास 2000 लोकांना आमंत्रित करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला आहे. संबंधित लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या मुलाच लग्न शाही थाटात

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी आपल्या मुलाचं लग्न शाही थाटात केलं आहे. या लग्नात त्यांनी अनेक आजी-माजी नेत्यांसह सदस्यांना आमंत्रित करत कोरोना नियम पायदळी तुडवले आहे. लांडे यांच्या मुलाच्या लग्नाला जवळपास 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी देवराम लांडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा शाही विवाहसोहळा चर्चेत

शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बारव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात दोन दिवसाचा एक शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा शाही विवाहसोहळा चर्चेत आला आहे. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसोबत आजी-माजी सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. देवराम लांडे यांच्या पुत्राच्या लग्नात कोरोना नियमाचं उल्लंघन झाल्याची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुन्नर पोलिसांनी बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी आणि देवराम लांडे यांच्यासह अन्य चार नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असताना, सरकारमधील नेत्यानं अशाप्रकारचं कृत्य केल्यानं सोशल मीडियात त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पार्थ लंबी रेस का घोडा,मित्रा थांबू नकोस’ नितेश राणे धावले पार्थ पवारांच्या मदतीला…

News Desk

‘त्या’ आत्महत्येसाठी स्वतःला अटक कराल का? निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

News Desk

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna