HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित पवार अजून अज्ञानी”, नारायण राणेंचा अजित पवारांवर निशाणा

सिंधुदुर्ग। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज(29 ऑगस्ट) जनाशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, त्यामुळे अजित पवार यांनी गप्प बसावे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अजून अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:चे खाते सांभाळावे अशी टीका राणे यांनी केली आहे.

अजित पवार अजून अज्ञान आहेत

नारायण राणे यांनी या जनाशीर्वाद यात्रेत सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या टिकेचा समाचार घेतला. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ‘आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे,’ असेही ते म्हणाले आहेत.

निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते,‘सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामे पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होते. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत.’ अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसेच ‘आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं,’ असा टोलाही पवारांनी लगावला होता.

राष्ट्रवादीचा हात?

नारायण राणे यांच्या अटकेमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा संशय भाजपला आहे. राणे यांनी जीभ सांभाळून बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने पोलिसांना मोकळीक देण्यात त्यांचा मोठा हात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवारांना घरातलेही गांभीर्याने घेत नसावेत,” अतुल भातखळकरांचा खोचक टोला

News Desk

विधानपरिषद उपसभापतींसह मंत्र्यांची पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात बैठक

Aprna

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण

News Desk