HW News Marathi
महाराष्ट्र

“आता यांच्या घरी पोरं होईल होतील का हे मी कसं सांगू?” पत्रकारांच्या प्रश्नांना राज ठाकरेंचं मिश्कील उत्तर

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज (१३ डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली आहे. ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचारी संप, म्हाडाचा पेपर फुटी आणि आगामी महापालिका या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. राज ठाकरेंना पत्रकारांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय? असा प्रश्न विचरले. यावर राज ठाकरेंनी त्यांच्या मिश्कील शैलीत उत्तर दिले की, “या प्रश्नाचे मी कसे सांगणार ?, की आता यांच्या घरी पोरं होईल होतील का हे मी कसं सांगू?, असे म्हटल्यानंतर पत्रकार परिषदेत खसखस झाली.

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याची गरज असून कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करणे योग्य नाही. जर एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल?,” असा सवाल करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, ” एसटी कर्मचाऱ्यांना चार-चार महिने पगार मिळत नाही. जे लोकांच्या घरी दिवसाला किंवा दोन दिवसाला भ्रष्टाचारातून पैसे घरी पोहोचले नाहीत तर त्यांचा जीव कासावीस होतो. एसटी कर्मचाऱ्यांना चार-चार महिने पगार नाही?, त्यांची दिवाळी विनापगार गेली. एसटी कर्मचाऱ्यांशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये, हे योग्य नसल्याचे राज ठाकरेंनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषद बोलत होते.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले

येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय?, असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “ते मला काय माहिती, हा प्रश्न तुम्ही मला कसा विचारता, या यांचे मी कसे उत्तर देऊ शकतो. हे तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना का हा प्रश्न विचाला नाही का, असा उलट सवाल राज ठाकरेंनी पत्रकारांना केला. यानंतर राज ठाकरे म्हणाले, या प्रश्नाचे मी कसे सांगणार ?, की आता आता यांच्या घरी पोरं होईल होतील का हे मी कसं सांगू?”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौरांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शेलारांना जामीन मंजूर

News Desk

शिक्रापुरात ६२ गरोदर महिलांना केले क्वॉरंटाईन, सोनोग्राफी करणारा डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

News Desk