HW News Marathi
मुंबई

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

मुंबई | मुंबईमध्ये (Mumbai) यंदाच्या मोसमातील आज सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD) मुंबईत आज (16 जानेवारी) सकाळी 13.8 अंसावर पोहोचला आहे. या वर्षाच्या हिवाळ्यातील हे सर्वात निच्चांक तापमान मानले जाते. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये 15 ते 17 जानेवारीदरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

मुंबई रविवारी दिवसाच्या कमाल तामानात घट झाली होती. मुंबई रविवारी कमाल तामान 26. 2 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यंदाच्या हिवाळ्यात आतापर्यंत सर्वा कमी तापमान 25 डिसेंबर रोजी 15 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यानंतर मुंबईत आज 13.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

दिल्लीपेक्षा मुंबईची हवा जास्त प्रदूषित

दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा प्रदूषित असल्याचे बघायला मिळाले असून मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. तापमानात घट झाल्यानंतर मुंबईतील हवाच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरली आहे. यामुळे शहरात पुन्हा आरोग्याच्या समस्या भेडसावद आहेत. दिल्लीतील सररासरी हवेची गुणवत्ता निर्देशांक 221 वर बघायला मिळाली असून मुंबईच्या सरासरी हवेची गुणवत्ता 322 वरे गेली आहे. तसेच दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा अधिक खराब झाल्याचे आकडेवरी दिसतोय.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ

News Desk

आज मध्यरात्रीपासून आंतरराज्यीय विमान सेवा बंद

swarit

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

Aprna