HW News Marathi
क्राइम मुंबई राजकारण

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. देशपांडे हे आज (3 मार्च) शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले असताना अज्ञात इसमांनी हल्ला केला. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या संदीप देशपांडे यांची प्रकृती स्थिर आहे. यानंतर देशपांडेंना हिंदूजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी देशपांडेंवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे आणि चिरंचीव अमित ठाकरे यांनी हिंदूजा रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. देशपांडेंनी हिंदूजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  देशपांडे हे आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. देशपांडेंवर क्रिकेटच्या स्टम्प्सने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. देशपांडेवर हल्लेखोरांनी चेहऱ्यावर कपड्याने झाकला होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

राजकीय वैमनस्यातून देशपांडेंवर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी दिली. देशपांडेवर हल्ल्याची माहिती मिळताच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते देखील उपस्थिती होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओवेसी वाट्याची भाषा करत असतील तर ….!

News Desk

भाजप-शिवसेना युती अभेद्य | देवेंद्र फडणवीस

News Desk

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

News Desk