HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या वैचारिक विचारसरणीचे! – प्रकाश आंबेडकर

मुंबई | उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक विचारसरणीचे आहे. त्यामुळे आम्हाला युतीची चर्चा सुरू असल्याचे वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर हे आज (16 जानेवारी) औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदे घेऊन वंचित आणि उद्धव ठाकरे ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) युतीसंदर्भात भाष्य केले.

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  “प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववाद हा संधीसाधूपणाचा होता. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व हे अवसरवादी हिंदुत्व होता. उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक विचारसरणीचे आहे. त्यामुळे आम्हाला युतीची चर्चा सुरू असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.”

 

चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्राकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायाल तयार आहे. मी पाटलांना तारीख मागितली आहे. शिवाजी पार्कात 5 लाख लोके बोलवून त्यांच्यासमोर सत्कार करेन. कारण म्हणजे ते सत्य बोलले, कोणी कोणी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मग त्या भीकेतून का असेना”, असे ते यावेळी म्हणाले

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीला राम राम ठोकणार ?

News Desk

“निष्ठावान कलातपस्वी हरपला”; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna