HW News Marathi
राजकारण

मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार?; आदित्य ठाकरेंचे ‘शिंदे सरकार’ला रोखठोक सवाल

मुंबई | “मुंबईचा जोशीमठ झाला, तर याला जबाबदार कोण?”, असा परखड सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केला आहे. आदित्य ठाकरेंनी आज (16 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्ला बोल केला.  मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मुंबईत सगळीकडे काँक्रिटीकरण झाले आहे. आधी जिथे मातीची मैदाने होती, तिथेही काँक्रिटीकरण झाले. त्यामुळे हे सगळे झाल्यावर मुंबईचा जोशीमठ झाला, तर याला जबाबदार कोण? असा परखड सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. जगातील कोणत्याही शहरात १०० टक्के काँक्रिटीकरण झालेले नाही, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला आहे. ६००० कोटी रुपयांचे काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होत असताना कोठेही लोकप्रतिनिधींना विचारण्यात आले नाही. हा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांचा अपमान आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी सरकारला १० रोखठोक सवाल केले आहेत. तुम्ही मुंबईकरांचा पैसा वापरुन जे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने बनवत आहात, यासाठी माझे दहा प्रश्न आहेत याची तुम्ही उत्तरे द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आता दुपारपर्यंत पालिकेकडून एक पत्रक येईल. त्यात गोडगोड लिहून येईल. सर्व पक्षांना हे पटणारे आहे का? आम्ही अजुनही यासाठी आंदोलने केलेली नाहीत. पण, मी सर्वच पक्षांना आपील करतो, ही गद्दारांची टोळी येऊन हात मारुन जातील. आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, हे सगळे असताना आता सुरू असलेल्यामुळे महापालिकेची एफडी तोडावी लागेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. कधीही जे आतापर्यंत घडले नाही, ते आता घडत आहे, ते तुम्हाला पटणारे आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरेंचे १० रोखठोक सवाल

१)  ४०० किलोमीटरचे रस्ते आहे, हे तुम्हाला कोणी सांगितले. यासाठी तुम्हाला प्रपोजल कोणी दिले?

२) लोकशाही मध्ये ४०० किलोमीरचे रस्त्याचे एवढं मोठं काम, सहा हजार कोटीच काम एका प्रशासकाने मंजूरी देणे, म्हणजे स्वत:च प्रपोज देणे आणि स्वत:च मंजूरी देणे हे योग्य आहे का?

३) साडे सहा हजार कोटी रुपये फंड बजेटमध्ये कसा दाखवणार?

४) ४०० किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी कालावधी दिला आहे का?

५) जो किलोमीटरचा रस्ता १० कोटी रुपयांना व्हायचा तोच रस्ता आता १७ कोटी रुपयांना होणार आहे, एसओआर २० टक्क्यांनी का वाढवला?

७) जास्त कॉक्रेटीकरण चांगले नाही, ते परवडणारे नाही, मुंबईचा जोशी मठ झाला तर याला जबाबदार कोण?

८)  काम दिलेल्या कॉन्ट्रक्टरांना मुंबईत काम केल्याचा अनुभव आहे का?

९) आयआयटी सारख्या संस्थेकडून अहवाल घ्यायचा असतो, ४०० किलोमीटर रस्स्त्यांसाठी असा अहवाल घेतला आहे का?

१०) देशात पाचच कॉन्ट्रक्टर आहेत का? देशात एवढे मोठे फक्त पाच कॉन्ट्रक्टर आहेत का?

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून सनी देओल गुरुदासपूर, तर किरण खेर यांना चंदीगडमधून उमेदवारी

News Desk

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले, आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

News Desk