HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार”, सत्यजीत तांबेंचे संकेत

मुंबई | “मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार आहे”, असे संकेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांनी दिले आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांवर आज मतदान पार पडले आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अपक्ष उमदेवारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्ष आदी मुद्यांवर भाष्य केले.

तुमचे पुढचे राजकारण हे अपक्ष म्हणूनच असणार आहे की कोणत्या पक्षासोबत जाणार आहात, यावर तुमची काय भूमिका आहे? या प्रश्नावर सत्यजीत तांबे म्हणाले, “मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार आहे. पुन्हा एकदा पत्रकारांनी सत्यजीत तांबेना विचारले की, विखे पाटलांनी आग्रह केला की भाजपमध्ये यावे? यावर ते म्हणाले, “मी अपक्ष उमेदवार आहे आणि मी अपक्षच राहीन. याव्यतिरिक्त कोणतेही राजकीय भाष्य मी आजच्या तारखेला करणार नाही,” असे म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली. सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “लवकरच मागच्या 10 ते 15 दिवसामध्ये राजकारण झाले. यातून माझ्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्ध सत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. आम्ही मुद्दाम यासाठी कोणतीही प्रतिक्रिया यासाठी दिली नाही. कारण, शब्दाने शब्द वाढून नये. आपण ज्या पक्षामध्ये आयुष्यभर राहिलो. खरे तर आम्ही बोललो नाही. वेळ आल्यावर आम्ही खरे तर या सर्व प्रश्ना उत्तर देणार आहोत.

राधा कृष्ण विखे पाटील यांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला मतदान करण्याचे आवाहन केली, अशी भूमिका घेतल्याबद्दल तुम्ही कसे बघता? सत्यजीत तांबेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “100 पेक्षा जास्त संघटनांनी मला पाठिंबा दिलेला आहे. विविध क्षेत्रातील लोक माझ्या पाठिशी उभे राहिले आहेत. चांगला उमेदवार म्हणून लोक जर पाठिशी उभे राहत असतील. आणि पक्षीय राजकारणाच्यावर या ठिकाणी ते माझ्यासोबत राहत असतील. तर यात आनंदच आहे.

योग्य वेळी बोलू

तुमच्या कुटुंबाचे 100 वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर योगदान राहिले आहे आणि काँग्रेसकडून होणार आरोप? या प्रश्नावर सत्यजीत तांबे म्हणाले, “काँग्रेसकडून नाही झाले. काँग्रेसमधील काही लोकांकडून झाले आहेत.” पत्रकारांनी विचारले की कोण लोक आहेत ते त्यावर म्हटले की, “सांगेन,  योग्य वेळी बोलू.”

योग्य वेळ आल्यावर मी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करेन.

बाळासाहेब थोरात यांच्या तुमचे काही बोलणे झाले का?, या प्रश्नावर सत्यजीत तांबे म्हणाले, “ते आजारी आहेत. त्यांच्या खाद्याचे ऑपरेशन झालेले आहे. त्यांच्या खाद्याला तीन फॅक्चर होते. त्या फॅक्चरमध्ये वायर टाकून ते ऑपरेशन झालेले आहे. ते साधेसुधे ऑपरेशन नाहीये. ते काही घरात बसून राहिले अशी परिस्थित नाहीये. त्यांना हालचाल करता येत नाही. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांना त्रास देण्याची गरज नाही. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. योग्य वेळ आल्यावर मी त्यांच्याशी चर्चा करेन.”

एबी फॉर्म आला नाही, यामुळे ती अपक्ष उमेदवारी  

तुमच्या अपक्ष उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा होता का? यावर सत्यजीत तांबे म्हणाले, “माझी अपक्ष उमेदवारीच नव्हती. माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाची होती. मी फॉर्म भरताना इंडिय नॅशनल काँग्रेस पक्षाचा फॉर्म भरलेला आहे. मी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडू शकलो नाही. म्हणून ती अपक्षात रुपांतरीत झालेली आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून अर्धसत्य दाखवित आहाता. मी अपक्ष उमेदवारी केली आहे. ते चुकीचे आहे. ते अर्ध सत्य आहे. त्यावर पूर्ण सत्य मी लवकरच सांगेन. तेव्हा लोक चकीत होतील.”

 

 

 

Related posts

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

News Desk

“मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna

“आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’,” निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Aprna