HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

मुंबई | कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीही मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही. अनेकदा कृष्णकुंजवर लोकांनी गर्दी केली तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. तसेच दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावेळी देखील विना मास्क उपस्थिती लावली.

राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे. राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं होतं. इतकचं नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता.

शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाच्या दरम्यान राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतो, असं उत्तर दिलं होतं. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजे, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

News Desk

Live Updates : महाराष्ट्र बंद कोठे काय घडतय

News Desk

शरद पवारांचे खंदे समर्थक गुलाबराव चव्हाण यांच्या हाती भाजपचा झेंडा!

News Desk