नवी दिल्ली । “मी हिंदू आहे. हिंदुत्ववादी नाही”, असं विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जयपूरमध्ये पक्षाच्या ‘महंगाई हटाओ महा रॅली’ला संबोधित करताना राहुल गांधींनी हे विधान केलं. “देशाच्या राजकारणात दोन शब्दांची एकमेकांसोबत चढाओढ सुरू आहे. त्यातला एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा शब्द आहे हिंदुत्व. पण मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही”; असं राहुल गांधींनी सुनावलं आहे.
राहुल गांधी पुढे याबाबत अधिक स्पष्ट करताना म्हणाले की, “हिंदू सत्याचा शोध घेतो. ज्याला सत्याग्रह म्हणतात. तर, हिंदुत्ववादी सत्ता शोधतात ज्याला त्याला सत्ताग्रह म्हणतात. हा हिंदू आणि हिंदुत्ववादी मधला फरक हा आहे. म्हणूनच मी हिंदू आहे, हिंदुत्त्ववादी नाही.” दरम्यान, यावेळी राहुल गांधीसह उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“…मग गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं?”
प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या की, “काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं? असं विचारणाऱ्यांनाच मला विचारायचंय की ही ७० वर्षांची चर्चा सोडा. पण गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं? हे सरकार निव्वळ उद्योगपतींसाठी काम करत आहे. काँग्रेसने ७० वर्षात जे निर्माण केलं ते भाजप विकत आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.