मुंबई | “सत्यजीतने फार ताणून न धरता. मधला जो एक महिन्याचा काळ होता. तो विसरून जावा. आणि काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अशी इच्छा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना फोन करून सत्यजीत तांबेला उमेदवारी देण्याची सांगितल्याचा खुलासा अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागेल होते. नाशिक पदवीधर मतादारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मते पडली. तर महाविकास आघाडीच्या पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते पडली आहे. तसेच सत्यजीत तांबे हे 29 हजार 465 मतांच्या फरकाने जिंकले आहे.
अजित पवार नेमके काय म्हणाले
अजित पवारांनी सत्यजीत तांबेच्या उमेदवारी संदर्भात बोलताना म्हणाले, “त्यावेळी मुल्लिकार्जुन खरगेसाहेबांना शरद पवारसाहेबांनी सांगितले होते की, तुम्ही आता राष्ट्रीय क्राग्रेसचे अध्यक्ष आहात. पवारसाहेबांनी सांगितले की, माझा जो अनुभव आहे. त्या अनुभवावरून तुम्ही तिथे सत्यजीतला उमेदवारी द्या. आणि विषय संपून टाका, असे सांगितले होते. तसे बिघतले होते की, वरिष्ठांच्या पण त्याचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेसने फार ताणून नये. आणि काँग्रेसने मोठेपणा दाखवावा. आणि सत्यजीतने पण फार ताणून न धरता. मधला जो एक महिन्याचा काळ होता. तो विसरून जावा. आणि काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे, अशी माझी इच्छा आहे.”
नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीच्या वेळी काय झाले
नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार दिला होता. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने एबी फॉर्म दिली होती. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्यात एकच खळबळच माजली होती. यानंतर काँग्रेस सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हक्कालपट्टी केली. यानंतर महाविकास आघडीने अपक्ष उमदेवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.