HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत…”, गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई | “उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. गोपीचंद पडळकरांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अनेक स्तरातून या निर्णयावर टीका करण्यात आली, तर काहींनी हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली.

“उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

यापूर्वीही केली होती टीकाविरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असं यापूर्वी पडळकर म्हणाले होते.

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्याने कालवंडलेला होता. मागच्या महिन्यात त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. फडणवीसांनी एकच विधान केल्याने पवारांचा कालवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

Related posts

शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात भरत गोगावलेंचे विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे तक्रार

Aprna

राजीनामा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव ?

swarit

रामदेव बाबांनी साधुसंताना केले धूम्रपान न करण्याचे आवाहन

News Desk