HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; भाजप आणि ‘मविआ’ची प्रतिष्ठा पणाला

मुंबई | पुण्याच्या (Pune) कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. कसबा मतदारसंघात (Kasba by-polls) भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे धंगेकर यांच्यात चुरस आहे. तर चिंचवड मतदार संघामध्ये (Chinchwad by-polls ) भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या तिरंगी लढत आहे.  या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचारासाठी आले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील पुण्याच्या पोटनिवडणूक काबीज करण्यासाठी दिग्गज नेते प्रचाराच्या रणांगणात उतरले होते. यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदानाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कसबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करण्यापूर्वी दगडूशेठ मंदीरात जाऊन गणपतीची आरती करून दर्शन घेतले. तर दुसरीकडे चिंचवडचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळी कसबा आणि चिंचवड दोन्ही ठिकाणी मतदान सुरू झाले. यानंतर कसबा मतदारसंघात सकाळी ९.३५ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान झाले. तर चिंचवडमध्ये सकाळई ९.३५ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान झाले.

 

 

 

 

Related posts

उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर जारी

Seema Adhe

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk