मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी फेसबुकवर मतदानाचा हक्क बजावत असल्याचा फोटो फेसबुकवर शेअर कले आहे. यामुळे रुपाली ठोंबरेंनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांवर केला जात आहे. “मी हा फोटो टाकलेला नाही. त्यामुळे गोपिनियेतेचा भंग होत नाही. मला कसब्यातील मतदारांनी त्यांचा फोटो पाठवला होता. यामुळे मी शेंगा खाल्या नाहीत. तर मी टरफले उचलणार नाही,” असे म्हणत रुपाली ठोंबरेंनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
रुपाली ठोंबरे यांनी आज सकाळी कसबा विधानसभा मतदारसंघातून मतदान केले. यावेळी कसबा मतदान करताना ईव्हीएमध्ये मतदान करतानाचा फोटो रुपाली ठोंबरेंनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. या फोटोवरून विरोधकांनी रुपाली ठोंबरे यांच्यावर टीकेची झोट उठवली. रुपाली ठोंबरेंनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “शुभ सकाळ कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा.”
रुपली ठोंबरे नेमके काय म्हणाल्या
“मी हा फोटो टाकलेला नाही. त्यामुळे गोपिनियेतेचा भंग होत नाही. मला कसब्यातील मतदारांनी त्यांचा फोटो पाठवला होता. रविभाऊंच ताई मतदान आहे. तो फोटो मी माझा डीपी आणि फेसबुकला पोस्ट केला. यामुळे मी शेंगा खाल्या नाहीत. तर मी टरफले उचलणार नाही. आणि माझ्या एका फोटोने असे भाजपला का त्रास होऊ लागला?”,असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.