मुंबई | “कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस जिंकल्यानंतर राज्य आणि देश जिंकू. परंतु, भाजपने तीन राज्य जिंकले ते बघायला विसरले”, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेसला विधीमंडळाच्या सभागृहातून लगावला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा (3 मार्च) पाचवा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या सभागृहातून कसब्याती पोटनिवडणुकीत राज्य सरकारचा झालेला पराभव, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, “कसब्यात भाजप हरल्याचा खूप लोकांना एवढा आनंद झाला की ते पेढे वाटायला लागली. आता काही लोक काँग्रेस जिंकल्यामुळे ऐवढे खूश झाले आहेत. ते म्हणाले की, राज्य जिंकू, देश जिंकू. अरे, पण तीन राज्य भाजपने जिंकले ते बघायला विसरले. आठवलेसारख्या पक्षाचे दोन आमदार तिकडे आले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला लगावला. ईशान्येकडील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे गुरुवारी (2 मार्च) निकाल हाती आले आहेत. या तीन राज्यापैकी नागालँडमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवारांचा विजयी झाला आहेत. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ऐवढे आले, “एक म्हणण आहे. बेगानी शादी मैं अब्दुल्ला दिवाना, सगळे नाचायला लागले.”
कसबानंतर आता परत चुका नाही होणार
मुख्यमंत्री म्हणाले, “तुम्हाला मी सांगतो, आम्ही इथे कसब्यामध्ये ज्या काही चुका झाल्यात त्या आमच्या लक्ष्यात आलेल्या आहेत. बरे झाले, आता सगळे अलर्ट झालेले आहेत. आता परत चुका नाही होणार, असे म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. यावर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आणि जनरल निवडणुकांमध्ये असे एकास एक नसतो. आता तुम्ही तर तीन पक्ष आहात ना. आम्ही तर युतीमध्येच लढलोय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण, तुम्ही वेगवेगळे लढलेले आहात. एकाची पार्टी उभी राहिली तर काय दुसरा भजन करत बसेल, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला. “बाबा तू निवडून ये, मी तुझ्यासाठी पाच वर्ष थांबतो, असे होणार आहे का? असा सवाल मुख्यमंत्री महाविकासआघाडीला केला”, असे ते सभागृहात म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.