HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू; नाशिकमध्ये कोण मारणार बाजी?

मुंबई | विधान परिषदेच्या (Legislative Council)  पाच जागांचे आज निकाल हाती येणार आहेत. यात पदवीधर (Graduate Election) 2 जागा तर शिक्षक मतदारसंघाच्या (Teacher Constituency Election) तीन जागांच्या मतमोजणीला आज (2 फोब्रुवारी) सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यार राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघ कोण बाजी मारणार हे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. पवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघात नेमके कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे चिरंजीव सत्यजीव तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घटनेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. सत्यजीत तांबेंनी पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. आता सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या चुरसेची लढत पाहायला मिळत आहे.

अमरावतीत भाजपचे रणजीत पाटील हे तिसऱ्यादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे उभे आहेत. तर तिकडे नागपुरात 22 उमेदवार रिंगणात आहे. पण, इथे चौरंगी लढत रंगली. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले,  भाजप समर्पित विद्यमान आमदार नागो गाणार. दरम्यान, कोकण शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला असून भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे हे निवडणूक लढवित आहेत. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काळे उमेदवार आहे तर भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा सामना करत आहेत.

 

Related posts

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, ६३०० कोटींचे कंत्राट रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

News Desk

उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

News Desk