मुंबई | महाराष्ट्रात सत्तांतर प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (14 मार्च) होणाऱ्या सुनावणी शिंदे गट युक्तीवाद करणार असून उद्या (15 मार्च) देखील शिंदे गटच युक्तीवाद करणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात 2 मार्चला झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी युक्तीवाद केला होता. यावेळी राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला होता. परंतु, तात्कालीन उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, असा युक्तीवाद हरीश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात मागील सुनावणीत केला.
सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा राज्यातील सत्तांतरावर सुनावणी सुरू होणार आहे. होळीच्या सुट्टीसाठी सुनावणी थांबली होती. यापूर्वी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला होता. तेव्हा कपिल सिब्बल यांचा दोन-तीन दिवस युक्तीवाद सुरू होता. यानंतर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामावर हरीश साळवेंनी जोरदार युक्तीवाद केला. यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेतलेले सर्व गोष्टी कशा अवैद्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या वकीलांनी केला आहे.
मागील सुनावणीत नेमके काय झाले
शिंदे गटाकडून आज सर्वोच्च न्यायातलात वकील रमेश जेठमलानी आणि मनींदर सिंह हे दोन्ही प्रमुख वकील युक्तीवाद करणार आहेत. आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून काही वेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत का?, यापूर्वी उद्धव ठाकरेंचा राजीनामा, आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील कारवाई ही केवळ दोन बैठकांना हजर न राहिल्यामुळे केली जात असेल तर ते चुकीचे आहे, असे युक्तीवादादरम्यान शिंदे गटाच्या वकीलांनी मागील सुनावणीत सांगतले. आता रज्यांतील सत्तांतर प्रकरण हे अॅकेडमीक प्रकरण आहे. याता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय करायचे आता राहिले असून हा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी करायचा आहे, असा देखील युक्तीवाद हरीश साळवेंनी यापूर्वीच्या सुनावणीत केलेला होता. यामुळे आजच्या सुनावणीत काही नवीन मुद्दे येत आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.