नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये आज (८ डिसेंबर) दुपारी कोसळले होते. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले आहे. रावत यांचे पार्थिव उद्या (९ डिसेंबर) दिल्लीला पोहचणार आहे. रावत यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
“सीडीएस बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक आणि एक सच्चे देशभक्त होते. रावत यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती,” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी रावत यांना श्रद्धांजली वाहिली.
Gen Bipin Rawat was an outstanding soldier. A true patriot, he greatly contributed to modernising our armed forces and security apparatus. His insights and perspectives on strategic matters were exceptional. His passing away has saddened me deeply. Om Shanti. pic.twitter.com/YOuQvFT7Et
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021
“तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे. या दुर्घटनेत आम्ही सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. यासर्वांनी अत्यंत तन्मयतेने भारताची सेवा केली. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत,” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे.
I am deeply anguished by the helicopter crash in Tamil Nadu in which we have lost Gen Bipin Rawat, his wife and other personnel of the Armed Forces. They served India with utmost diligence. My thoughts are with the bereaved families.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.