HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच

मुंबई | भाजपचे नेते आणि खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले. यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पुणे लोकसभा मतदारसंघात  पोटनिवडणूक (Pune Lok Sabha by-election) होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये गिरीश बापट यांच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावांची चर्चा पुण्यात रंगू लागली आहे. या सर्वांच्या नावबरोबरच महाविकास आघाडीकडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर हे देखील पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनानंतर दोन दिवसांमध्येच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार उल्लेख असलेले पोस्टर पुण्यात आलले होते. यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

 

 

 

Related posts

आजच्या वटपौर्णिमा सणानिमित्ताने जाणून घ्या… व्रतकथा, महत्व अन् मुहूर्त

News Desk

एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात पण महाविकासआघाडीत नाराजी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण

News Desk

…तरीही उपोषण सुरू ठेवायला मी वेडा आहे का ?

News Desk