HW News Marathi
महाराष्ट्र

मंगाराणी : माहेरच्या मतदारांनी दिले जि.प.समाज कल्याण सभापती पद,सासर ही देईल का ?

माजी समाज कल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर यांची सलग तिस-यांदा विजयी

उत्तम बाबळे

नांदेड : – नांदेड जि.प.च्या माजी समाज कल्याण सभापती मंगाराणी सुरेश अंबुलगेकर यांनी संपन्न झालेल्या जि.प. व पं.स.निवडणुकीत मुखेड तालुक्यातील बा-हाळी गटातून बहुमताने विजयश्री संपादीत केली असून त्यांचा हा सलग तिस-यांदा विजय असल्याने या ‘ हॅट्रीक ‘ चे अभिनंदन होत आहे.भोकर तालुक्यातील पाळज हे त्यांचे माहेर आहे व याच पाळज गटाने आपल्या कन्येस विजय मिळऊन देत जि.प.समाज कल्याण सभापती पद मिळऊन दिले.तर सद्या त्या सासर च्या मुखेड तालुक्यातून बहुमताने निवडूण आल्या असल्याने पुन्हा एकदा समाज कल्याण सभापती पद मिळऊन देण्यासाठी सासरची मंडळी पुढाकार घईल का ? अशी चर्चा होत आहे.

मुखेड तालुक्यात जि.प.चे ७ गट व पं.स.चे १४ गण आहेत.मुखेड तालुका हा सद्या सद्या भाजपाच्या विद्यमान आमदार डाॅ.तुषार राठाोड यांच्या अधिपत्त्याखाली असल्याने जि.प.सावरगाव बु. ,सावरगाव (पी), व मुक्रमाबाद या ३ गटात भाजपा ने विजयीची बाजी मारली .अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाला त्यांच्याशी मोठी झुंज द्यावी लागली.झालेल्या अटीतटीच्या लढतीत चांडोळा गटातून काँग्रेसच्या सुशिलाबाई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, येवती गटातून कोमलवाड शकुंतलाबाई तर बा-हाळी गटातून मंगाराणी सुरेश अंबुलगेकर या ७,५४९ मते घेऊन त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार अनुराधा पिटलेवाड (४,४५०)यांचावर मात करत ३,०९९ अशा बहुमताने विजयी झाल्या.शिवसेनेला केवळ एक जागेवर विजय मिळिता आले.मंगाराणी सुरेश अंबुलगेकर यांना सन २००८-९ मध्ये भोकर तालुक्यातील देवठाणा गण पोट निवडणुकीत निवडूण दिले.नंतर सन २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जि.प.पाळज गटातून बहुमताने निवडूण दिले.माहेरच्या या मतदारांनी सलग २ वेळा निवडूण दिले.नव्हे तर यावेळी त्यांना नांदेड जि.प.चे समाज कल्याण सभापती पद ही माहेरच्या मतदार बंधु भगिणींनी निवडूण दिल्यामुळे प्राप्त झाले.आता संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुखेड तालुक्याने अर्थातच सासरच्यांनी त्यांना निवडुण दिले आहे.जि.प.नांदेड निवडणुकीत यावेळीही माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्ष प्रदेशादेक्ष खा.अशोक चव्हाण यांनी २८ जागांवर विजय मिळवित बहुमताने वर्चस्व ठेवले आहे.रा.काँ.पार्टीच्या आघाडीतून नांदेड जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकविला जाणार असे चर्चील्या जात आहे.यामुळे पुन्हा एकदा मंगाराणी सुरेश अंबुलगेकर यांची समाज कल्याण सभापती पदी वर्णी लागू शकते.परंतु त्यासाठी सासरच्या मंडळींनी देखील प्रयत्न करने तेवढेच गरजेचे आहे.म्हणुन यावेळी पुढाकार घेऊन ही सासरची मंडळी त्यांना हे पद मिळऊन देईल का ? अशी चर्चा होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा या पलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही – नारायण राणे

News Desk

प्रत्येक नागरिकांचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

आजच्या पिढ्यांनी पाहिलेले दुष्काळाचे हे चित्र, पुढच्या पिढीला दिसणार नाही !

News Desk