HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगित; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई | ओबीसी जागावर होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. या निर्णयामुळे ओबीसींच्या ४०० जागांवर परिणाम होणार असल्याची माहिती प्रसार माध्यामांतून प्रसारित झाली आहे. म्हणजे आयोगाने ओबीसी वॉर्ड मधील निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. उर्वरित जागांवर नियोजनानुसार मतदान होणार असल्याची माहिती देखील आयोगाकडून देण्यात आली आहे. ओबीसी प्रभाग वगळता इतर जागांवरील निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि १०५ नगरपंचायतीच्या समित्यामध्ये होणाऱ्या निवडणुकातील ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. यानुसार राज्यातील १०५ नगरपंचयातींमधील जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगिती झाल्या आहेत. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेतील ओबीसी जागांना स्थगिती झाल्या आहेत. आता राज्यातील पंचायत समितीच्या ४५ ओबीसी जागांना स्थगित झाल्या आहेत.

ओबीसी आरक्षणाला तुर्तास स्थगिती

राज्यातील स्थानिक निवडणुकीत ओबीसीना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे न्यायालायने तुर्तास तरी ओबीसी आरक्षण स्थगिती दिली आहे. राज्यचा आध्यादेश ग्राह्य धरला येणार नाही, असेही न्यायालयाने नमुद केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय मानला जातो. न्यायालयाने ओबीसीच्या आरक्षणाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

Related posts

लवादाच्या बाबत शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यावे, पंकजा मुंडेंचा सल्ला!

News Desk

अयोध्या दौऱ्यावरून वातावरण खराब होता कामा नये! – प्रविण दरेकर

Aprna

साहेब, सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा…. उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का….

News Desk