मुंबई | दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी शाई फेकल्याची घटना घडली आहे. कुबेर हे नाशिकमध्ये साहित्य संमेलनासाठी गेले असताना त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी शाईफेकली. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह आग्रलेख लिहिल्यावरून वाद आणि पुस्तकावर लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणावरुन त्यांच्यावर शाईफेकली असल्याची प्रथमिक माहिती मिळली आहे. कुंबेरांवर शाई फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध नाशिक पोलीस करत असल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (५ डिसेंबर) शेवटाच दिवसाच्या परिसंवादात सहभागी होणार होते. परंतु परिसंवादात सहभागी होण्यासाठी गेले होते. पण, या परिसंवादात सहभागी होण्यापूर्वीच कुबेरांवर संभाजी ब्रिगेटच्या लोकांनी त्यांच्यावर शाईफेकली. कुबेरांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स-दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे त्यांच्यावर शाईफेकल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.