HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची लगबग

मुंबई। सगळ्याच पक्षांनी आपापल्या पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली सध्या पहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तशी सुरवात आता केली आहे.मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाने अनेकांना हेरलं होत. आणि यामध्ये मनसे अध्यख राज ठाकरे देखील अडकले होते. मात्र या सगळ्या मधून बाहेर पडत आता पुन्हा राज यांनी कामाला सुरवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील येणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आणि या दौऱ्याची माहीती आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

राज यांचा दौरा असा असेल

आता मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे 6 डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरु होणार आहे. ते 14 तारखेला औरंगाबादमध्ये येतील. त्यानंतर 16 डिसेंबरला पुण्यात पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. यात महत्त्वाचा दौरा म्हणजे अयोध्या दौरा मानला जातोय कारण राज ठाकरे अयोध्या दौरा देखील करणार आहे.

मात्र या सगळ्या दौऱ्याच्याआधी पुण्यात 6 डिसेंबरला एक छोटी बैठक होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबरला औरंगाबादमध्ये कोरोनाचे सगळे नियम पाळून काही पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सकाळी 10 वाजता ठेवली आहे. त्यानंतर पुण्यात 16 डिसेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, निवडून आले आहेत त्यांची आणि, माजी नगरसेवक तसेच आताचे नगरसेवक यांची सगळ्यांची बैठक पार पडणार आहे. आता दोन बैठकांची तारीख ठरलेली आहे. राज ठाकरे सहा राज्यातील सहा विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. अशी माहिती आजच्या बैठकीनंतर मनसेचे बाळा नांदगावकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रभाग क्रमांक २२ ची पोटनिवडणूक लढवणार नाही | मनसेने दाखवला आपला मोठेपणा

News Desk

ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण! – गोपीचंद पडळकर

Aprna

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता ‘या’ ठिकाणी होणार…

News Desk