मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांच्या विषयी अपशब्द काढल्याने त्यांना अटक व्हावी अशी शिवसैनिकांनी मागणी केली होती. नारायण राणे यांना अटक होऊन नंतर काल (२४ ऑगस्ट ) त्यांना जमीनही देण्यात आला. नारायण राणे यांना अटक व्हावी म्हणून मुंबई काल(२४ ऑगस्ट) शिवसैनिकांनी राडा घातला होता आणि त्यात भाजप- सेना कार्यकर्ते आमने सामने आले होते.
युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक
युवासैनिकांनी राणे यांच्या विरोधात आंदोलन केल्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.’
युवासेना कोअर कमिटीने आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray जी यांची भेट घेतली. pic.twitter.com/eSNxdgtnXe
— Shivsena Communication (@ShivsenaComms) August 24, 2021
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. यावेळी युवासेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले.
आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?
केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.
खोटी कलमं लावण्यात आली
न्यायदंडाधिकारी पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली . राणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलले आहेत , वक्तव्यामागे त्यांचा काही कट होता का , याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली . राणे हे जबाबदार व्यक्ती आहेत मग ते बेजाबाबदारपणे का वागले ?, असा मुद्दाही त्यांनी मांडला. तर राणे यांचं वक्तव्य राजकीय स्वरूपाचं आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याने त्यांना जामीन द्यावा, असा युक्तीवाद राणे यांच्या वकिलांनी केला. अटक करण्यापूर्वी त्यांना कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. त्यांच्या वक्तव्यामागे कोणतंही षडयंत्र नव्हतं. पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे . खोटी कलमं लावण्यात आली आहेत . त्यांची अटक बेकायदेशीर आहे , असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे.
तसेच राणेंच्या प्रकृतीची माहितीही वकिलांनी न्यायालयाला दिली. सुमारे पाऊन तास दोन्ही बाजूचा युक्तीवाद सुरू होता . त्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाने केली मागणी फेटाळून लावत जामीन मंजूर केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.