HW News Marathi
महाराष्ट्र

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त?

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सौमय्या यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. किरीट सौमय्या यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने छगन भुजबळ यांची ₹१००

कोटींची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. किरीट सौमय्या यांनी एक विडिओ मधून हि संपूर्ण माहिती दिली आहे.

₹100 कोटींच्या बेनामी मालमत्ता जप्त

किरीट सौमय्या यांनी विडिओच्या माध्यमातून हा गौप्स्फोट केला आहे. ते म्हणाले, “आयकर विभागाने समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळच्या १०० कोटीच्या बेनामी मालमत्ता जप्त केल्या आहेत. कोलकाताच्या बोगस सेल कंपन्यांद्वारे हे मनी लॉंडरिंग करण्यात आलं होतं.

अंजली दमानिया, किरीट सौमय्या आम्ही वेगवेगळ्या कोर्ट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. ईडी, एससीबी आणि आता आयकर विभाग, याच्या अंतर्गत आयकर विभागने जी प्रेस नोट इशू केली आहे, सेशन कोर्ट मध्ये दावा दाखल झाला आहे, आणि त्यांना ७ वर्ष पर्यंत साज होऊ शकते”, असा विडिओ त्यांनी टाकला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेत्यांनाही चक्रीवादळाचा जबर फटका, नांदेडमध्येच थांबावे लागणार

News Desk

मुंबै बँक बोगस मजूर घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Aprna

‘अंडे आणि कोंबडी’ला शाकाहारीचा दर्जा द्या | संजय राऊत

News Desk