मुंबई। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राज्याच्या राजकारणात नेहमीच ट्रोल होताना दिसतात. प्रत्येक वेळी त्यांना टीकेचा सामना करावा लागतो. अशातच आता अमृता फडणवीस यांचं गाणं सिनेरसिकांना ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुहूर्त झालेल्या ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील महत्त्वाचं गाणं नुकतंच रेकॅार्ड करण्यात आलं आहे. मात्र प्रत्येक दहा महाराष्ट्राने पाहिला आहे की अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज झाल्यावर त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत असतो. मात्र आता अमृता यांचं गाणं भेटीला आल्यावर रसिक प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’
गेल्या काही दिवसांपासून पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात बिझी आहेत. नुकतंच अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये या चित्रपटातील ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे गाणं करण्यात आलं आहे. नेहमीच आपल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र समोर येणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या पुन्हा महाराष्ट्रातील जनतेच्या भेटीला मराठी चित्रपटातून साकारलेल्या गाण्याच्या माध्यमातून येत आहेत.
ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केलीय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ‘महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा’, अशा खोचक शब्दात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.