HW News Marathi
महाराष्ट्र

“इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक!”

मुंबई | इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक असणार आहे. तर केंद्र आणि राज्यातील सरकारच्या नियमावालीतील तफवात दूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुक्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच केंद्राशी चर्चा करून नवीन नियमावली येणार असल्याचेही पवारांनी सांगितले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढण्याआधीच काळजी घ्या, असे आवाहन देखील पवारांनी राज्याला केले आहे

दरम्यान, केंद्राशी चर्चा करून आता नवीन नियमावली येणार असून राज्यात सर्वत्र सारखीच नियमावली असणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शाळासंदर्भात प्रश्न बोलताना अजित पवार म्हणाले, “शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी शाळा सुरू करण्यावर चर्चा झाली होती. तेव्हा कोरोनाचा नव्या व्हेरियंट नव्हता. मात्र, या व्हेरियंट आल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा असून राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. राज्यात सर्वत सारखे नियम असायला हवेत. या संदर्भात केंद्राशी चर्चा करणार असल्याचेही पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यातील उद्योग बंगालला घेऊ चाल्यात यावरून भाजपने सवाल केला होता. यावर पवार म्हणाले, “उद्योगांना ज्या राज्यात वीज, पाणी आणि जागा मिळते, ते त्या राज्यात जातात, असा टोला त्यांनी लगावला आहेत. दरम्यान, तुटेपर्यंत ताणून नका, असे म्हणत पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख सल्लागार पदी नियुक्त करण्यात आली असून, कुंटेच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. या प्रस्तावला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे देखील पवारांनी सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या यांचा हसन मुश्रीफांवर शेकडो कोटी घोटाळ्याचा आरोप!

News Desk

बीडमध्ये अनोखी घटना! शेळीनं दारात लावलेल्या झाडाचा शेंडा खाल्ल्यामुळे वाद

Aprna

तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्टच सांगा, पवारांचा काँग्रेसला सवाल 

News Desk