HW News Marathi
महाराष्ट्र

रजनीगंधा खा, डोकं शांत ठेवा!; आव्हाडांच्या वादग्रस्त सल्ल्याने खळबळ

मुंबई । आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. भिवंडीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एक अजब सल्ला दिला आहे. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) झालेल्या या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “डोकं शांत ठेवायचं असेल तर मांस कमी खा. हवंतर रजनीगंधा खा.” दरम्यान, आव्हाडांच्या या अजब आणि वादग्रस्त सल्ल्यानंतर आता राजकीय वर्तृळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड या कार्यक्रमात म्हणाले की, “मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की त्यांनी आपलं डोकं गरम करून घेऊ नये, शांत राहावं. विरोधकांना तुमची डोकी भडकवयाची आहेत. त्यात त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. पण तुम्ही शांत राहा. त्यासाठी मांस कमी खा. तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवं ते ठेवा पण शांत राहा.” आता आव्हाडांच्या या विधानाने राज्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात गुटखा बंदी असताना दुसरीकडे त्यांच्या या विधानाने मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जितेंद्र आव्हाडांनी यावेळी या कार्यक्रमात पुढे बोलताना मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. “आपण लक्षात घ्यायला हवं की देशात महागाई उच्चस्थरावर आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील अशी घोषणा मोदींनी केली होती. मग आता त्याचं काय झालं?”, असा सवाल यावेळी आव्हाडांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचं संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक ट्वीट

News Desk

आपल्याच वहिनीवरती अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं? नाव न घेता राणेंचा खळबळजनक आरोप

News Desk

भ्रष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीसांनी जोड्यांनी मारले पाहिजे!

Aprna