HW News Marathi
महाराष्ट्र

नव्या व्हेरियंटच्या धोक्यामुळे राज्यात नवी नियमावली जारी

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मुंबईची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ नोव्हेंबर) बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर राज्यांना हायअलर्ट जारी केला असून महाराष्ट्र सरकारने देखील आज नवीन नियमावाली जारी केली आहे. प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडे RTPCR टेस्ट असने बंधनकारक आहे.

दरम्यान, राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे दोन्ही डोस झालेल्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर मॉल, सभागृह, कार्यक्रमासाठी दोन डोस असलेल्यांना प्रवेश देणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लॉकल ट्रेनच्या प्रवासासाठी युनिवर्सल पास देण्यात आला आहे. यात लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात दोन्ही डोस बंधनकारक

राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रिक्षा, टॅक्सी, बस, कॅब बंधनकारक आहेत. तसेच राज्यात येणाऱ्या प्रवाशांनी ७२ तास आधीच RTPCR चाचणी टेस्टे देणे बंधनकारक आहेत. पण, सिनेमा हॉल, विवाह सोहळा, सभागृहात ५० टक्के लोकांनाच्या क्षमतेने उपस्थित राहवे. या ठिकाणी मास्क घातलेल्या नसल्यास ५०० रुपये दंड लागणार आहे. दुकांनामध्ये ग्राहकांनी मास्क न घातले तर दुकानदाराला १० हजार दंड वसूल करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

News Desk

मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!

News Desk

पवार-ठाकरेंच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk