HW News Marathi
महाराष्ट्र

पवार-ठाकरेंच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा अधिकृत प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पवार आणि ठाकरे ‘ताज लॅण्ड्स एण्ड’मध्ये राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची सत्ता स्थापनेवर चर्चा केली. या दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटे बैठक चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची सतत भेटी घेतली आहे. मात्र, सेनेने राष्ट्रवादीला सत्ता स्थपानेसाठी अधिकृत असा प्रस्ताव दिला नव्हता. पवार आणि ठाकरें आज (११ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीच्या वेळी अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तर शिवसेनेतून उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेही ‘मातोश्री’वरुन ‘ताज लॅण्ड्स एण्ड’मध्ये पोहोचले.

काँग्रेसच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी निर्णय घेणार !

काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक बोलविली होती. राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून पक्षश्रष्ठी सायंकाळी ४ वाजता पुन्हा एकदा बैठक बोलवून काँग्रेस निर्णय सांगणार असल्याचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी “काँग्रेस-राष्ट्रवादीची एकच भूमिका असून काँग्रेसच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी निर्णय घेणार,” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रसार माध्यामांना दिली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगाव येथे झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या निषेधार्थ बदलापुरात कडकडीत बंद

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची संपूर्ण यादी

News Desk

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री!

News Desk