HW News Marathi
व्हिडीओ

खोत-पडळकरांचा आंदोलनातून काढता पाय!; आता सदावर्ते करणार ST कर्मचाऱ्यांचं नेतृत्त्व?

राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचं गुरुवारी स्पष्ट दिसून आलंय. मुंबईतल्या आझाद मैदानात गेल्या १५ दिवसांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या St कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून काढता पाय घेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन आपण तात्पुरतं संपवत आहोत अशी घोषणा केल्यानंतर अगदी काहीच मिनिटांध्ये अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलंय. इतकंच नव्हे तर आता ST च्या विलीनीकरणासाठी हे आंदोलन डंके की चोट पे चालणार असल्याचा इशाराही सदावर्ते यांनी दिलाय. दुसरीकडे राज्यभरातील ST कर्मचारीही सरकारच्या वेतनवाढीवर नाराज असून विलनिकरणाच्या मुद्द्यावरच ठाम असल्याचं दिसून येतंय. तशा तीव्र प्रतिक्रिया येतायत. त्यामुळे ST च्या आंदोलनाचं भविष्य काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. नेमकं काय घडतंय राज्यात पाहूया.

#SadabhauKhot #GopichandPadalkar #GunratnaSadavarte #AnilParab #UddhavThackeray #MVA #BJP #MSRTC #STProtest #MaharashtraPolitics #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Praniti Shinde Congress | मी ‘सोलापूर शहर मध्य’ मतदारसंघातूनच लढणार !

Gauri Tilekar

Shivsena, Bjp| शिवसेना मोदींविरुद्ध रणनीती आखतेय का ?

News Desk

Prithviraj Chavan , Devendra fadnavis | नागपूरला पूरस्थिती असती, तर फक्त भाषण दिली असती का ?

Arati More