HW News Marathi
देश / विदेश

“शेजारी पाहा काय घडतय”, मेहबूबा मुफ्ती यांचा पंतप्रधानांना इशारा

नवी दिल्ली | तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावरती तिथली परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हवाला देत मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे. शेजारील देशात पाहा कशाप्रकारे शक्तीशाली अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, जम्मू-काश्मीरवर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे.

आमची परीक्षा घेऊ नका?

मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून आपला मत मांडलं आहे. “मी वारंवार सांगत आहे की आमची परीक्षा घेऊ नका? सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय, एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून सामान बांधून परत जावं लागलं. तुम्हाला अजूनही संधी आहे. ज्याप्रकार वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटलं आहे. बेकायदेशीरपणे, जे जम्मू-काश्मीरचं चित्र तुम्ही खराब केलं आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल.”

ही काय बडबडते आहे?

“असं वाटतं असेल की आम्ही फार छोटे आहोत, ही काय बडबडते आहे? ही काय करू शकणार? मात्र कधी कधी एखादी मुंगी जेव्हा हत्तीचा सोंडेत शिरते तेव्ही ती त्याचं जगणं कठीण करते.” असं देखील यावेळी मुफ्ती यांनी बोलून दाखवलं आहे.

पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात सक्रिय

जिहादच्या नावे जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं जात आहे.मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तालिबानने राष्ट्रपती भवनचा ताबा घेतल्यानंतर काही तासातच पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात सक्रिय झाल्या.

राष्ट्रपती हमीद करझई यांच्यावर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा समावेश

अफगाण सरकारमध्ये सिराजुद्दीन हक्कानीचा समावेश व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा उपनेता आणि वॉन्टेड घोषित दहशतवादी आहे. त्याच्यावर काबूलमधील एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. यामध्ये एका अमेरिकी नागरिकासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर 2008 मध्ये माजी राष्ट्रपती हमीद करझई यांच्यावर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा समावेश होता.

पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी…आता तुम्ही म्हणाल, इतका चांगला अर्थ मग कामं इतकी जिहादी का? तर कट्टर धार्मिक मदरशातून तालिबान उभा राहिलाय, त्यामुळे हे कसे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. सौदी अरेबियाने अफगाणिस्तानात असे मदरसे पोसले, ज्यात सुन्नी कट्टर इस्लामिक विचारधारेचा प्रचार केला जायचा. आधीच्या मुजाहिदीन जिहाद्यांमधीलच हा एक गट. पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील पश्तून भागात हा गट चांगलाच पोसला. ज्याला पाकिस्तानकडूनही चांगलीच मदत मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यूज क्लिकच्या कार्यालयावर ईडीचा छापा

News Desk

#CoronaVirus : आज देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार

swarit

अयोध्येतील राम मंदिरसाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना

swarit