मुंबई | गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळे वेतनात वाढ करण्यात आल्याची घोषणा केल्याचे परबांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात राज्य सरकारकडून वेतन वाढीचा प्रस्तावर दिला. या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर भाजप नेते गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ देखील याबैठीकत उपस्थित होते. या बैठकीत सरकारच्या वेतन वाढीवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर परबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांची भेट घेतील.
“गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची प्रमुख मागणी होती. याबाबत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत होतो. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयात असून त्रिसदस्यीय समिती बनवली आहे. या समितीला विलीनीकरणाचा निर्णय १२ आठवड्याच्या आत समितीने घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. समिती जो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाईल. यानंतर समितीचा अहवाल उच्च न्यायालयात पाठविला जाणार आहे. “उच्च न्यायालयाने विलीनीकरणाबाबत समिती स्थापन केली आहे. या समितीची जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती,” असे परबांनी स्पष्ट केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे असे असणार वेतन
एसटीच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरकारकडून सरासरी ५००० रुपयांनी वाढ करण्यात आली. तर कर्मचाऱ्यांच्या इतर भत्त्यातील मूळ वेतनात ७, २०० रुपये वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार १६ हजार रुपये होता, त्यांचा पगार २३ हजार ४० रुपये झाला. म्हणजे आता त्यांचा पूर्ण पगार २८ हजार ८०० रुपये झाला.
एसटी कर्मचाऱ्याची २० वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वतेनात सरासरी २,५०० रुपयांची वाढ केली आहे. ज्या कर्मचाऱ्याचे वेतन ३७ हजार ४४० रुपये होतं. त्या कर्मचाऱ्यांचा पगार आता ४१ हजार ४० झालं आहे. कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ३७ हजार होते. त्या कर्मचाऱ्याच्या वेतनात वेतन ५३ हजार २८० रुपये होतं. यामुळे वेतन ३९ हजार ५०० होणार आहे. आता त्या कर्मचाऱ्यांचे सुधारीत वेतन ५६ हजार ८८० रुपये होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.