HW News Marathi
महाराष्ट्र

“राणे म्हणतात, दीपक केसरकर शेंबडे आमदार”;आता केसरकरांकडून राणेंचा समाचार

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या वक्तव्यांनी चांगलेच परिचित आहेत. आणि त्यांच्या वक्तव्यांनी मोठी खळबळ देखील उडालेली उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर राणे यांना अटक झाली जामीनही मिळाला मात्र ते प्रकरण चांगलंच तापलं होतं. आणि आता देखील तसंच काहीच झालं, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर हे शेंबडे आमदार म्हणून आहेत असं वादग्रस्त वक्तव्य आता पुन्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल आहे. त्याच वक्तव्याचा समाचार घेतात दीपक केसरकर यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिल आहे. राणेंच्या सिंहासनाला मी हादरे दिले म्हणून त्यांच्या मनात सल आहे. त्यामुळेच ते माझ्यावर ऊठसूठ टीका करत असतात, असा पलटवार करत केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली.

टीका केल्याशिवाय त्यांच राजकारण चालत नाही

तर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलतांना राणेंवर टीका केली आहे. राणेंचं सिंहासन मी हलवल ती राणेंच्या मनात सल. नारायण राणेंच सिंहासन मी हलवलं याची कायम सल त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांच राजकारण चालत नाही. ते नुसतं बोलतात. कामं करत नाहीत. मी बोलून दाखवत नाही आणि ज्यावेळेला बोलतो तेव्हा काय होत हे तुम्हाला माहीत आहे. तुमचं सिंहासन हललं कोणामुळे हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याचीच सल तुमच्या मनात आहे हे मला माहीत आहे, असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. तर केसरकर आणि राणे या दोघांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सामना रंगलेला पहायला मिळतो.

नारायण राणे काय म्हणाले होते?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरही कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली. सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला ? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी टीका राणे यांनी केली होती. मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली होती. विधानसभेत मी एक इतिहास निर्माण केला आहे. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही, असा टोला देखील त्यांनी केसरकरांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात…..

Arati More

अमोल मिटकरींना भाषण सुरु असतांनाच अर्धांगवायूचा सौम्य झटका!

News Desk

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा!

News Desk