HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परबांच्या निवासस्थानाबाहेर शाई फेकण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. परबांच्या शासकीय निवासस्थानी घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. जनशक्ती संघटना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जनशक्ती संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आज (२३ नोव्हेंबर) परबांच्या निवासस्थानी जावून शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यामध्ये काल (२२ नोव्हेंबर) महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. या तिघांमध्ये जवळपास ४ तास बैठक झाली होती. याबैठकीसंदर्भात बोलताना परब म्हणालं, “काही चर्चा सार्वजनिक करण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोन्ही बाजूचे समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा आणि तशी चर्चा या बैठकीत झाली. हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे.”

राज्यात एसटी कर्मचारी २८ ऑक्टोबरपासून संपवर गेला आहे. तर कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. आज आझाद मैदानत आंदोलनांनी काल राज्याचं तेरावे घातले. तर आज त्यांनी राज्याचे चौदावे घातले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात – डॉ. वीरेंद्र तावडेला जामीन

News Desk

“मी पक्ष सोडला म्हणूनच थोरातांना प्रदेशाध्यक्षपद, नाहीतर त्यांचे कर्तृत्व काय ?”

News Desk

शरद पवारांच्या आग्रहामुळे परमबीर सिंग यांची पदावरुन उचलबांगडी?

News Desk