HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात पुढील २ दिवस मेघागर्जनेसह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा

मुंबई। राज्यात हिवाळा सुरू झाला आहे. परंतु तरी देखील राज्यात पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरात आणि पुण्यात काल (२१ नोव्हेंबर) सायंकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या सरी बरसल्या तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला.
राज्यात इतर जिल्ह्यातील ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे रब्बी पिकांना आता धोका निर्माण झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी पावसामुळे पिकांची नासाडी देखील झालेले चित्र पाहायला मिळले.
राज्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकणा, मध्य आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर २४ तासात समुद्रात न जाण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

खोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा – धनंजय मुंडे

swarit

रूपाली चाकणकर अमृता फडणवीसांना म्हणाल्या ,सर्कस की शेरनी !

News Desk