HW News Marathi
महाराष्ट्र

‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ नवाब मलिकांचा पुन्हा एकदा वानखेडेंवर निशाणा!

मुंबई। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत राहिले आहेत. आणि त्याला कारण देखील तसेच आहे. एनसीबी चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि नवाब मलिक या दोघांमध्ये सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुरबुरी झालेल्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. रोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करत असतात. आणि आता पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा मलीक यांनी निशाणा साधला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. आणि त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो ट्विट केला आहे.ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत असल्याचा फोटोज आता नवाब मलिक यांच्याकडून समोर आला आहे.

‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आपल्या ट्विटर अकाउंट वरून फोटो पोस्ट करताना म्हणतात. की, ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देत नवाब मलिक यांच्याकडून ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोवॉर’ करत नवीन गौप्यस्फोट केलाय. त्यांनी वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. आणि या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

या दाव्यावर कोर्ट आजच आपला निकाल देणार

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा मलिक यांचा दावा आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तिथे मलिक यांनी आपल्याकडील पुरावे सादर केले आहेत. त्याशिवाय मुंबई महापालिकेने एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून पालिकेकडील नोंदीनुसार वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद केले आहे. या दाव्यावर कोर्ट आजच आपला निकाल देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेवर हल्ले, राऊतांचा आरोप

Aprna

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता; केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता – अस्लम शेख

News Desk

भाजप आणि केंदीय यंत्रणांविरोधात आता राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार! – नवाब मलिक

News Desk