HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच जणांना मिळाली उमेदवारी

मुंबई | राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपकडून कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई या पाच जागांसाठी उमेदवारांची नाव दिली आहे. भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल, नागपूरकडून चंद्रशेखर बावनकुळे, अकोला-बुलढाणा – वसंत खंडेलवाल आणि मुंबईमधून राजहंस सिंह या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलढाणा वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर या निवडणूक होणार आहे. विधापरिषद निवडणुका १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबरला विधान परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडी कडून ज्यांना नोटीस गेली ते अनिल परब नेमके कोण आहेत?

News Desk

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

Aprna

बीडच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Aprna